जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासांत रूग्णसंख्येत ९०६ ने वाढ झाली.
वीस जणांचा मृत्यू; बाधितांची संख्या ३४ हजारांजवळनगर: देशात आता कोरोना अतिसंक्रमित क्षेत्रात नगरचा समावेश होत असून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हजाराच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. आज एकाच दिवशी नऊशेहून अधिक रुग्ण आढळले. दरम्यान, एकाच दिवशी कोरोनाने वीस जणांचा बळी घेतला.जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासांत रूग्णसंख्येत ९०६ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता चार हजार ७६८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेत ९६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेत होकारात्मक अहवाल आलेल्यांत नगर शहर ४५ संगमनेर ५, राहाता १, नगर ग्रामीण १७, श्रीरामपूर १, भिंगार १,नेवासे ७, श्रीगोंदे ४, अकोले १, राहुरी २, जामखेड १, मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४०३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यात नगर शहर १६३, संगमनेर १०, राहाता २३,पाथर्डी ५, नगर ग्रामीण ५४, श्रीरामपूर २१, भिंगार ९, नेवास १९, श्रीगोंद ७, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ३१, शेवगाव ३, कोपरगाव ७, जामखेड ६ आणि कर्जत तीन अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४०७ जण बाधित आढळुन आले. त्यात नगर शहरातील १७, संगमनेर २९, राहाता ४१, पाथर्डी ३०, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर १८, भिंगार४, नेवासे ६४, श्रीगोंदे २२, पारनेर १२, अकोले ९, राहुरी ६६, शेवगाव २४, कोपरगाव २९, जामखेड १९ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान, आज ८४० रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. त्यात नगर शहरातील २५०, संगमनेर ६२, राहाता ६९, पाथर्डी ५, नगर ग्रामीण ५६, श्रीरामपूर ७८, भिंगार १४, नेवासे ४०, श्रीगोंदे ३७, पारनेर २५, अकोले २७, राहुरी ४२, शेवगाव ४६, कोपरगाव २१,जामखेड ३२, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल आठ अशा रुग्णांचा समावेश आहे.कोरोनामुक्त: २८,५१२ॲक्टिव्ह रूग्ण:४,७६८मृत्यू:५३३एकूण रूग्ण:३३,८१३