राजस्थानने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित २० ओव्हरमध्ये ६ गडी बाद १५४ रन्स केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ३६ रन्स केले.
दुबई, दि. २२ ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्सवर सनरायजर्स हैदराबादने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळविला आहे. राजस्थानने विजयासाठी ठेवलेल्या १५५ रन्सचं आव्हान हैदराबादने २ गड्यांच्या मोबदल्यात १८.१ ओव्हरमध्ये पूर्ण केले. मनीष पांडे आणि विजय शंकरच्या अफलातून खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानचा दणदणीत पराभव केला. राजस्थानने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित २० ओव्हरमध्ये ६ गडी बाद १५४ रन्स केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ३६ रन्स केले. तर त्यापाठोपाठ बेन स्टोक्स ३०, रियान पराग २०, तर स्मिथ आणि उथप्पाने प्रत्येकी १९ धावा केल्या. राजस्थानकडे बॅटिंग ऑर्डर तगडी असताना देखील मोठी धावसंख्या उभारण्यात राजस्थानला अपयश आलं. राजस्थानने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना हैदराबादल पहिल्याच षटकांत झटका बसला. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर वॉर्नर झेलबाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा उडवत आर्चरने हैदराबादला दूसरा धक्का दिला. विजय शंकर आणि मनीष पांडेच्या भागिदारीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानवर ८ विकेट्सने विजय मिळवला. हैदराबाद या विजयासह गुणतक्यात थेट ५व्या स्थानी झेपही घेतली आहे.