पाच मजली असलेली ही इमारत दहा ते वीस वर्षे जुनी असल्याचं बोललं जात आहे.
रायगड,दि. २४ ऑगस्ट : जिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. काजळ पुरा या भागात सांयकाळी 7 वाजता ही घटना घडली असून, ढिगाऱ्याखाली 100-150 लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, मदत कार्य सुरू आहे.स प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाडमधील काजळपुरा परिसरात होती. पाच मजली असलेली ही इमारत दहा ते वीस वर्षे जुनी असल्याचं बोललं जात आहे. सायंकाळच्या सुमारास पत्त्यांसारखी ही इमारत कोसळली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, रात्र झाल्याने बचावकार्यात थोडा अडथळा येत आहे.रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, महाडमध्ये कोसळलेली ही इमारत पाच मजली होती आणि फार जुनी नव्हती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.