IMG-LOGO
महाराष्ट्र

Monday, May 27
IMG

अभिजित पानसे यांना महाराष्ट्र विधानपरिषदेसाठीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडल्यानंतर विधानपरिषदेसाठी पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून त्यात भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अभिजित पानसे यांना महाराष्ट्र विधानपरिषदेसाठीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांनुसार ही उमेदवारी निश्चित झाल्याचं समोर आलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांची दावेदारी आत्तापर्यंत निश्चित मानली जात होती. तसेच, भाजपाकडून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल, असंही बोललं जात होतं. मात्र, त्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय असेल? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Share: