IMG-LOGO
क्रीडा

अभिमन्यूने रचला इतिहास

Friday, Jul 02
IMG

2002 मध्ये सर्जी कर्जाकिनने सर्वांत तरुण ग्रँड मास्टर होण्याचा विक्रम केला.

वाॅशिंग्टन, दि.  2 जुलै : भारतीय वंशाच्या अभिमन्यू मिश्रा या 12 वर्षांच्या वयात इतिहास रचला आहे. अभिमन्यू बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत तरुण ग्रँड मास्टर झाला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या अभिमन्यूने 19 वर्षांचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी बुद्धीबळ इतिहासाचा सर्वांत तरुण ग्रँड मास्टर होण्याचा विक्रम सर्जी कर्जाकिनच्या नावावर होता.2002 मध्ये सर्जी कर्जाकिनने सर्वांत तरुण ग्रँड मास्टर होण्याचा विक्रम केला. त्या वेळी कर्जाकिनचे वय 12 वर्षे 7 महिने होते; पण अभिमन्यूने वयाच्या 12 वर्षे आणि चार महिन्यात ग्रँड मास्टर बनून कर्जाकिनचा 19 वर्षांचा विक्रम मोडला. अभिमन्यूने बुडापेस्ट येथे आयोजित ग्रँडमास्टर स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर लिओन मेनडोंकाला पराभूत करून हे स्थान मिळवले आहे. ग्रँड मास्टर झाल्यानंतर अभिमन्यूने सांगितले, की प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांचा फायदा त्याला मिळाला. अभिमन्यू म्हणाला, "लढाई खूप कठीण होती; पण शेवटी, लिओनने चुका केल्या, ज्याचा मला फायदा झाला. माझ्या या यशामुळे मी अत्यंत खूश आहे.'

Share: