IMG-LOGO
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात अपघात, चार ठार

Monday, Dec 28
IMG

कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराईजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला.

अहमदनगर, दि. २८ डिसेंबर : अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराईजवळ रात्री उशिरा हा  अपघात झाला. सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सुभद्रा हॉटेलसमोर त्रिभुनवाडी शिवारात खासगी बस क्रमांक (एम.एच. 38-  8555) ही पुण्याहून नांदेडकडे जात असताना सँट्रो कार क्रमांक ( एम.एच. 12 सीडी 2917) ही पुण्याच्या दिशेने जात असताना समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की यात सँट्रो कारचा जागीच चुराडा झाला. सँट्रो कारमधील तीन जण जागीच ठार झाले. स्थानिकांनी तातडीने जखमी व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.रामभाऊ शंकरराव कदम, (वय 60, रा जायगाव ता.परळी जि. बीड) परमेश्‍वर लक्ष्मण काळे (वय 40, रा.धामणगाव ता.पाथ्री जि परभणी) आणि केशव विठ्ठल बोराटे (वय 23 रा मंठा जि जालना) अशी मृतांची नावे आहेत.  या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.दरम्यान,  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटरवर 37 पुण्याहुन मुंबईकडे जाणारी ऑरेंज ट्रॅव्हल्स या खासगी बसची पुढे जाणार्‍या एका मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुढे जाणार्‍या ट्रकवर आदळली. अपघातात बसमध्ये असणा-या 15 प्रवाशांपैकी आठ जण किरकोळ जखमी झाले असून चालक तसेच अन्य एक जण  गंभीर जखमी झाला आहे. सर्व प्रवाशांना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Share: