IMG-LOGO
मनोरंजन

अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह

Wednesday, Sep 23
IMG

निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घेण्याचे ठरवले.

मुंबई, दि. २३ सप्टेंबर  : खबरदारी घेत चित्रीकरण करत असतानाही आता मालिकांच्या सेटवर कोरोना विषाणूने शिरकाव केल्याचे चित्र आहे. झी मराठीच्या 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येते आहे. निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घेण्याचे ठरवले.  त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याचे समजते. त्यांच्यावर उपचार देखील सुरु करण्यात आले आहेत.

Share: