बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शविला आहे. गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच तिला दोषी ठरवू नये
मुंबई, दि. ०२ सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. परिणामी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही टीका अभिनेत्रीने विद्या बालनला आवडलेली नाही. तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. जो पर्यंत ती निर्दोष आहे असं सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही तिला दोषी समजणार का? असा सवाल तिने टीकाकारांना विचारला आहे.बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शविला आहे. गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच तिला दोषी ठरवू नये, अशी भूमिका व्यक्त केली जात आहे. काल अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, शिबानी दांडेकर यांनी रियाला पाठिंबा दर्शवित अद्याप गुन्हा सिद्ध झाला नसल्याचं मत व्यक्त केलं होतं.