हॅनी ट्रॅपसंदर्भांतील हा नगर जिल्ह्यात पहिला गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला.
नगरमध्ये हॅनी ट्रॅपचा पहिला गुन्हा दाखल, महिलेसह एकजण अटकअहमदनगर, दि. १५ मे : महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्यानंतर त्याचा अश्लील व्हिडीओ बनवून एका व्यावसायिकास ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करणार्या महिलेस व तिच्या साथीदारास पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही महिला नगर तालुक्यातील असून, तिचा साथीदार कायनेटीक चौक परिसरात राहणारा आहे. हॅनी ट्रॅपसंदर्भांतील हा नगर जिल्ह्यात पहिला गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेमध्ये पोलिसांनी अमोल मोरे (वय 30) व संबंधित महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.नगर तालुक्यातील जखणगाव परिसरातील एका तीस वर्षीय महिलेने तिच्या साथीदारासह तालुक्यातील एका मोठ्या व्यावसायिकास शरीरसंबंधाचे आमिष दाखविले. या महिलेसोबत शरीरसंबंध केल्याचे मोबाईलवरुन व्हिडिओे शूटिंग केले. त्यानंतर त्या महिलेच्या साथीदाराने त्या व्यावसायिकास चाकूचा धाक दाखवून व त्याला बांधून मारहाण केली तसेच त्याच्याकडे एक कोटी रुपयाची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर हा व्हिडिओ पोलिसांना दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. त्यानंतर त्या दोघांनी व्यावसायिकाच्या गळ्यात असलेली पाच तोळे वजनाची सोन्याची साखळी व हातातील साडेसहा तोळे वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या व 84 हजार 300 रुपये रोख असा ऐवज मारहाण करून बळजबरीने काढून घेतला. ही घटना 26 एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जखणगाव येथील महिलेला ताब्यात घेतले असता तिने एका साथीदार बरोबर या गुन्ह्याची कबुली दिली. व्यावसायिकाची हिसकावून घेतलेली सोनसाखळी भिंगार अर्बन बँकेत भावाच्या नावाने गहाण ठेवल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिच्या घरातून एक अंगठी, 69 हजार 300 रुपये रोख तसेच बँकेत ठेवलेली साखळी ताब्यात घेतली. पोलिसांनी कायनेटीक चौक येथून या महिलेच्या साथीदाराला ताब्यात घेवून त्याच्याकडून गुन्ह्यातील 15 हजार रुपये जप्त केले असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. आणखी काही जणांचा समावेश?एक कोटी रुपयांची खंडणी मागून लाखोंना गंडा घालणार्या या दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये अन्य काही जणांचा समावेश असण्याची शक्यता असून, पोलिस त्या दृष्टिकोनातून तपास करीत आहेत. नगरच्या कायनेटिक चौक येथे राहणारा आरोपी मोरे याने फिर्यादीला त्या महिलेचे घर दाखवले होते. ही महिला जखणगाव येथे राहात असून ती एका किराणा मालाच्या दुकानाची मालकीण आहे. त्या महिलेने फिर्यादीला घरी बोलावून त्याच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले व त्याच वेळेला व्हिडीओ काढून ठेवला होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.