IMG-LOGO
मनोरंजन

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची नियुक्ती

Thursday, Oct 01
IMG

सुप्रसिध्द डायरेक्टर शेखर कपूर यांची पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे, दि. २९ सप्टेंबर : सुप्रसिध्द डायरेक्टर शेखर कपूर यांची पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. एफटीआयआयचे माजी अध्यक्ष बी.पी सिंग यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी ४ मार्च रोजी संपला होता. त्यांना पुन्हा मुदतवाढ घेण्याची इच्छा नव्हती. मात्र मंत्रालयाने त्यांच्यासह सोसायटीच्या अशासकीय सदस्यांचा कालावधीही सहा महिन्यांनी वाढविला.  शेखर कपूर हे अभिनेता, निर्माता आणि डायरेक्टर आहेत. हिंदी सिनेमा आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलं आहे. मिस्टर इंडिया आणि मासूम सारखे सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. एलिजाथेथ या सिनेमासाठी त्यांना ऑस्करचं नामांकन देखील प्राप्त झालं होतं. बॅनडेट क्वीन, मिस्टर इंडिया आणि मासूम या शेखर कपूर यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृती आहेत. 'एलिझाबेथ' या चित्रपटाकरिता ऑस्करसाठी त्यांना नामांकन मिळाले होते. 

Share: