राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
मुंबई, दि. ०४ सप्टेंबर : राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच नाना पटोले यांना करोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये," असे नाना पटोले यांनी ट्विट केले आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. या दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन चाचणी करण्यात येणार असून ज्या आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.