IMG-LOGO
महाराष्ट्र

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची कोविड चाचणी निगेटिव्ह

Wednesday, Dec 02
IMG

पंकजा मुंडे यांनी आपल्या सर्दी आणि ताप आला आहे, त्यामुळे आयसोलेट होत असल्याचे सांगितले होते.

बीड, दि. २ डिसेंबर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. पंकजा मुंडे यांनी ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली आणि त्यानंतर या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता त्या पुन्हा एकदा चाचणी करणार आहेत आणि मगच त्या सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.पंकजा मुंडे यांनी आपल्या सर्दी आणि ताप आला आहे, त्यामुळे आयसोलेट होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आज कोविडची चाचणी केली असता रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. खुद्द पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून सांगितले की, 'माझी कोविड-19 (covid-19) ची टेस्ट निगेटिव्ह आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या काळजी व्यक्त केली त्यांचे आभार.' असे ट्विट केले आहे. 

Share: