IMG-LOGO
महाराष्ट्र

विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती ; किरीट सोमय्यांनी पक्षाचा आदेश धुडकावला

Wednesday, Sep 11
IMG

किरीट सोमय्या यांच्या या निर्णयानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, दि. ११  : किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती पक्षाकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे पद नाकारलं आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भाजपाच्या नेतृत्वाला नकार कळवला आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी एक पत्रकही प्रसिद्ध करत भाजपा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी खासदार रावसाहेब दानवे यांना पाठवलं आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या निर्णयानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “किरीट सोमय्या हे पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Share: