IMG-LOGO
महाराष्ट्र

जळगावात भाजपला दणका, महापौर निवडणूक आजच; याचिका फेटाळली

Wednesday, Mar 17
IMG

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या होणार्‍या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

औरंगाबाद, दि. १७ मार्च : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव महापालिकेमध्ये शिवसेनेने जोरदार सर्जिकल स्ट्राईक करत 30 नगरसेवक आपल्या तंबूत ओढून आणले आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक टाळण्यासाठी भाजपने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती; पण न्यायालयाने भाजपची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक ही ऑनलाईन होणार आहे. जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या तंबूत गेलेल्या फुटीर नगरसेवकांना पक्षादेश न बजावता आल्यानं भाजपने न्यायालयात याचिका दाखल केली आणि महासभा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन घेतली तर पक्षादेश बजावता येईल, अशी भूमिका मांडली; परंतु उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका फेटाळून लावली आहे. कोरोना परिस्थिमुळे निवडणूक ऑनलाइन घेण्यासाठी न्यायालयाचे आदेश दिले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या होणार्‍या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्‍चित केले आहे.

Share: