IMG-LOGO
महाराष्ट्र

स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेऊन डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या !

Monday, Nov 30
IMG

डॉ. शीतल आमटे या बाबा आमटे यांची नात आणि विकास आमटे यांची कन्या आहे. संपूर्ण आनंदवनाची जबाबदारी शीतल आमटे यांच्यावर होती.

चंद्रपूर, दि. ३० नोव्हेंबर : तरुण सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.शीतल आमटे या बाबा आमटे यांची नात आणि विकास आमटे यांची कन्या आहे. संपूर्ण आनंदवनाची जबाबदारी शीतल आमटे यांच्यावर होती. बाबा आमटेंच्या तिसऱ्या पिढीचे त्या नेतृत्व करत होत्या. शीतल आमटे काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत वाद पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावर आला. शीतल यांच्यामुळे वाद होत असल्याचा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे.

Share: