1983 मध्ये 'गांधी' चित्रपटासाठी ऑस्कर जिंकण्याबरोबरच, भानु अथैया यांना ऑस्करमध्ये नामांकित होणार्या विविध चित्रपटांना मत देण्याचे अधिकारही मिळाले.
मुंबई, दि. १६ ऑक्टोबर : 1982 मध्ये रिचर्ड अँटेनबरोच्या जगप्रसिद्ध चित्रपट 'गांधी'साठी सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनरचा पुरस्कार जिंकणार्या भानु अथैय्या यांचे मुंबईतील कुलाबा येथील घरी दीर्घ आजाराने निधन झाले. भारतासाठी त्यांनी पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. 1983 मध्ये 'गांधी' चित्रपटासाठी ऑस्कर जिंकण्याबरोबरच, भानु अथैया यांना ऑस्करमध्ये नामांकित होणार्या विविध चित्रपटांना मत देण्याचे अधिकारही मिळाले. त्यानंतर त्यांनी राम तेरी गंगा मैली, हीरो हिरालाल, अग्निपथ, चांदनी, लगान आणि स्वदेश यासारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी काम केले. 1991 मध्ये गुलजार दिग्दर्शित 'लेकीन' या चित्रपटासाठी आणि 2003 मध्ये आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' या चित्रपटासाठी भानु अथैया यांना सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनरचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.