केंद्र सरकारने यापूर्वीही मला दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी यावेळी केंद्र सरकारवर केला.
अहमदनगर, दि. ८ डिसेंबर : दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. आज सकाळी अण्णांनी ग्रामदैवत संत यादवबाबांचे व पद्मावती देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.केंद्र सरकारने यापूर्वीही ही दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाहीत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप अण्णा हजारे यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने यापूर्वीही मला दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी यावेळी केंद्र सरकारवर केला. मी सर्व भारतीयांना आवाहन करतो की सध्या जे आंदोलन दिल्लीत सुरू आहे, ते आंदोलन संपूर्ण भारतभरात परसण्यासाठी साऱ्यांनी सहभागी व्हा. केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. असं घडलं तरच सरकारवर दडपण येईल. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर माझ्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन दिल्लीमध्ये करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.