IMG-LOGO
मनोरंजन

‘ब्लॅक पँथर’फेम अभिनेता चॅडविक बोसमन यांचं निधन

Saturday, Aug 29
IMG

चॅडविकच्या प्रतिनिधीने सांगितले की, चॅडविकची पत्नी आणि कुटुंबिय अंतिम काळात त्याच्या सोबत होते.

लॉस एंजलिस, दि. २९ ऑगस्ट : हॉलीवुड स्टार चॅडविक बॉसमॅनचे शुक्रवारी निधन झाले. मार्व्हल स्टूडियोची फिल्म 'ब्लॅक पँथर' मध्ये मुख्य भूमिका साकारणारा चॅडविक 43 वर्षांचा होता आणि मागील 4 वर्षांपासून तो कॅन्सरने पीडित होता. न्यूज एजन्सी एपीनुसार, चॅडविकच्या प्रतिनिधीने त्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. चॅडविकचे निधन लॉस एंजलिसमध्ये त्याच्या घरी झाले.एपीच्या रिपोर्टनुसार, चॅडविकच्या प्रतिनिधीने सांगितले की, चॅडविकची पत्नी आणि कुटुंबिय अंतिम काळात त्याच्या सोबत होते. तो कोलोन कॅन्सर (आतड्यांचा कर्करोग) ने पीडित होता. चॅडविकने आपल्या करियरमध्ये '42' आणि गेट ऑन अप सारख्या फिल्ममधून आपले नाव तयार केले आणि नंतर 2018मध्ये आलेली मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या फिल्ममध्ये ब्लॅक पँथरची भूमिका साकारून तो प्रेक्षकांमध्ये हिट झाला.

Share: