IMG-LOGO
महाराष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तुरुंगातून होणार कायमची सुटका !

Friday, Apr 05
IMG

दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली असून सध्या गवळी हा नागपूरच्या कारागृहात आहे.

मुंबई, दि. ५ : कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी नाशिक जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड अरुण गवळी याची तुरुंगातून कायमस्वरूपी सुटका होण्याची शक्यता आहे. या संदर्भात न्यायालयाने सरकारला आदेश दिले असून १० जानेवारी २००६ च्या शासन निर्णयानुसार शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर पुढील ४ आठवड्यात निर्णय घ्या असे देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला म्हटले आहे.गुंड अरुण गवळीला मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केल्या प्रकरणी आणि आणखी एका दुसऱ्या गुन्ह्याप्रकरणी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली असून सध्या गवळी हा नागपूरच्या कारागृहात आहे.

Share: