देशमुख यांचे नाव आरोपी म्हणून फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप; वाझे नियुक्तीत सहभागाचा ठपकामुंबई, , दि. २४ एप्रिल : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. तसेच सचिन वाझे यांच्या नियुक्तीतही देशमुख यांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. देशमुख यांचे नाव आरोपी म्हणून फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सीबीआयच्या पथकाने देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी छापे मारले आहेत. देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले. जवळपास साडेसहा तास देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकार्यांनी झाडाझडती केली. यानंतर सीबीआयची टीम सुखदा निवासस्थानातून बाहेर पडली. 12 अधिकार्यांची टीम आज सकाळी साडेसातच्या सुमारास देशमुख यांच्या सुखदा निवासस्थानी पोहोचली होती. सुखदा निवासस्थानासोबतच इतर नऊ ठिकाणी देखील सीबीआयच्या अधिकार्यांनी छापेमारी केली. यामध्ये काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, देशमुख सध्या नागपूरमध्ये असल्याची माहिती आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला देशमुख यांची चौकशी केली होती. उच्च न्यायालयाने देशमुख यांची चौकशी होणे महत्वाचे असल्याचे म्हटले होते. देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशमुख यांच्या घरावरील छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप सिंग यांनी केला होता. उच्च न्यायालयाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. न्यायालयाने शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याची सीबीआयला परवानगी दिली होती; पण सीबीआय धाडी टाकून या परवानगीचा गैरवापर करून, देशमुख यांची बदनामी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही केंद्र सरकार या माध्यमातून राजकीय उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे. ’प्राथमिक चौकशीतून काय समोर आले हे न्यायालयासमोर मांडण्याआधीच होत असलेल्या या कारवाईचा त्यांनी निषेध केला. अशा धाडी राजकीय नेत्यांना बदनाम करण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. देशमुख यांनी तपासात सहकार्य केल्याचे त्यानी निदर्शनास आणले.दया..कुछ तो गडबड जरूर हैखासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी ट्वीट करत केंद्र सरकारला धारेवर धरले. उच्च न्यायालयाने चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते; पण सीबीआय अतिरेक करत आहे, असे म्हणताच दया..कुछ तो गडबड जरूर है असा टोला या कारवाईवरून लगावला आहे.बदनामीचा खेळन्यायलयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते काय?, असा सवाल नवाब मलिक यांनी सीबीआयला विचारला आहे. सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केले जात आहे. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.नेत्यांकडून फेक न्यूजउच्च न्यायालयाने सीबीआयला कधीही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले नाहीत. त्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास सीबीआयला कायद्यानुसार पुढे जाण्याचे निर्देश दिले आहेत. चुकीची माहिती पसरवू नका, आम्ही आपल्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा करत नाही, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. यासोबतच त्यांनी न्यायालयच्या आदेशातील मजकूरदेखील जोडला आहे.