IMG-LOGO
महाराष्ट्र

राज्यात ४८ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता

Monday, Aug 17
IMG

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात देखील बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई, दि. १७ ऑगस्ट : सध्या मोसमी पावसाने जोरदार आगमन केल्याने मुंबई, कोल्हापूर आणि राज्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी तर अगदी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा २-३ दिवसांची विश्रांती घेतल्यावर राज्यात पुढील ४८ तासात अतिमूसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात देखील बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण होईल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

Share: