IMG-LOGO
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांना न्यायालयाचा दणका, याप्रकरणी दिले चौकशीचे आदेश

Saturday, Aug 22
IMG

पाटील यांनी २०१६ ते २०१९दरम्यान उत्पन्नाच्या स्रोतबाबत खोटी माहिती दिली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

पुणे, दि. २२ ऑगस्ट : पुणे न्यायालयाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दणका दिला आहे. न्यायालयाने निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं कळतंय.१५ सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. पुणे न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी हे आदेश दिले आहेत.पाटील यांनी २०१६ ते २०१९दरम्यान उत्पन्नाच्या स्रोतबाबत खोटी माहिती दिली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. २०१२ साली कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र सादर झालेले असताना ते अद्याप सादर झालेले नाही, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात दिली असल्याची तक्रार डॉ. हरिदास यांनी न्यायालयात केली आहे. माझ्या विरोधातील तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली तथ्यहीन तक्रार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Share: