IMG-LOGO
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील प्रगतीपथावरील लघु पाटबंधारे योजनेची कामे कालमर्यादेत पूर्ण करा

Tuesday, Oct 06
IMG

जलसंधारण विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. ते प्रकल्प अधिक गतीने पूर्ण व दर्जेदार करावे. जिल्ह्यातील या प्रकल्पांमुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

मुंबई, दि.०६ सप्टेंबर  : रायगड जिल्ह्यातील प्रगतीपथावरील लघु पाटबंधारे योजनेची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.रायगड जिल्ह्यातील विविध लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या कामासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, मुख्य अभियंता सुनील कुशिरे, व्यवस्थापकीय संचालक वि.क.नाथ, अधीक्षक अभियंता सु. स. खांडेकर आणि हरिभाऊ गिते उपस्थित होते.जलसंधारणमंत्री श्री.गडाख म्हणाले, जलसंधारण विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. ते प्रकल्प अधिक गतीने पूर्ण व दर्जेदार करावे. जिल्ह्यातील या प्रकल्पांमुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या विविध मंजुरी तातडीने मिळवाव्या. याकरिता निधी वेळेवर देण्यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत पालकमंत्री कुमारी अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी तांबडी, घोटवळ, बारपे, नागलोली, लिपणीवावे, घोणसे, वांदेली, किन्हेश्वरवाडी, लोहारखोंडा, कोतवाल, जांबरुंग, या लघु पाटबंधारे तर काकल, डोंगरोली, कोंढवी, झिराड,  किंजळोली या साठवण तलावांच्या कामांना गती देण्याविषयीची मागणी केली.

Share: