मविआच्या मित्रपक्षांचाही विचार करण्यात आला आहे. या सर्व जागांचे वाटप झाल्यानंतर समाजवादी पक्षाला सामावून घेण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती आहे.
मुंबई, दि. २२ : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची शिष्टाई फळाला आली असून महाविकास आघाडीत मुंबई आणि विदर्भावरुन सुरू असलेला वाद अखेर निवळला आहे. बाळासाहेब थोरांत यांच्या मध्यस्तीनंतर ठाकरे आणि काँग्रेसनं सामंजस्याची भूमिका घेतली आहे. मध्ये, मुंबईतील बहुतांश जागांवर शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस १०३ ते १०८ जागांवर निवडणूक लढेल. तर, शिवसेना ठाकरे गटाला ९० ते ९५ जागा देण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८० ते ८५ जागा देण्यात येणार आहे. मित्र पक्षांना ६ ते १० जागा सोडण्यात येणार आहे.दरम्यान, महाविकास आघाडीचे जागावाटप करताना मविआच्या मित्रपक्षांचाही विचार करण्यात आला आहे. या सर्व जागांचे वाटप झाल्यानंतर समाजवादी पक्षाला सामावून घेण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती आहे. आज दुपारी मविआच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक पार पडली. त्यानंतर, ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. लवकरच महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल.