ज्या चॅटचा उल्ले परमबीर सिंह यांनी केला आहे, त्यातील बदलही पाटील यांनी निदर्शनास आणले असून त्यामुळे परमबीर यांच्याच अडचणीत वाढल्या आहेत.
वरिष्ठ अधिकार्यांचे जबाब; परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढमुंबई, दि. ७ एप्रिल : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिलेले नव्हते, तर अशा प्रकारची वसुली केली जात आहे का, अशी विचारणा त्यांनी वाझे याांच्याकडे केली होती, असे जबाब परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी दिले आहेत. ज्या चॅटचा उल्ले परमबीर सिंह यांनी केला आहे, त्यातील बदलही पाटील यांनी निदर्शनास आणले असून त्यामुळे परमबीर यांच्याच अडचणीत वाढल्या आहेत. परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पत्रात उल्लेख असलेले पाटील यांच्या चॅटचा मजकूर आणि प्रत्यक्ष दिलेल्या जबाबात तफावत आहे. मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी तीन लाख रुपये जमा करण्यास गृहमंत्र्यांनी वाझेला सांगितल्याचा चॅटमध्ये उल्लेख आहे; पण प्रत्यक्ष जबाबात गृहमंत्र्यांनी स्वतःहून वाझेंना त्याबाबत विचारणा केल्याचा उल्लेख आहे.वाझेने आपल्याला सांगितले, की मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्यक्ष तीन लाख रुपये जमा होत असल्याची माहिती आपल्याला मिळाल्याची विचारणा गृहमंत्र्यांनी वाझेकडे केली, असा जबाबात उल्लेख आहे.गृहमंत्र्यांनी वाझेला पैसे जमा करण्यास सांगितले नव्हते, तर गृहमंत्र्यांनीच असा प्रकार मुंबईत सुरू आहे का, अशी वाझेकडे विचारणा केल्याचे पाटील यांच्या जबाबात उघड झाले आहे. भुजबळ आणि पाटील 4 मार्च 2021 रोजी अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वर बंगल्यावर त्यांना भेटले असल्याचा सिंग यांच्या पत्रात उल्लेख आहे;मात्र या तिघांची एकत्र बैठक झाली नसल्याचे या दोन्ही अधिकार्यांनी जबाबात म्हटले. चार मार्च रोजी आपण अधिवेशनाच्या ब्रिफींगसाठी गृहमंत्र्यांना ज्ञानेश्वरीवर भेटलो, तेव्हा संजय पाटील तिथे नव्हते. मी बाहेर पडताना दारात मला संजय पाटील भेटल्याचे भुजबळ यांच्या जबाबात म्हटले आहे. वाझे यांच्या नियुक्तीची शिफारस ही परमबीर यांनीच केली होती, हे आता पत्रासह समोर आले आहे. त्यामुळे परमबीर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहे. वाझे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. याबद्दल परमबीर यांनी 25 मे 2020 रोजी पत्र लिहून वाझे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या शिफारसीनंतर वाझे यांची गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. हा विभाग मुंबई क्राईम ब्रँचच्या अंर्तगत येतो. वाझे यांचे डिटेक्शन क्राईम ब्रँचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट सिपी मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे वाझे यांना बंधनकारक होते; मात्र वाझे हे थेट परमबीर यांच्या संपर्कात होते. एनआयएकडून परमबीर यांची चौकशीदरम्यान, आज परमबीर सिंग यांना दक्षिण मुंबई येथील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेल्या गाडी पार्क प्रकरणी चौकशीसाठी एनआयएची पायरी चढावी लागली. सकाळी साडेनऊच्या सुमारास परमबीर हे एनआयएच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची चौकशी एनआयएचे उच्चाधिकारी करत आहे.वाझेंच्या चौकशीस सीबीआयला परवानगीविशेष एनआयए न्यायालयात वाझे यांना हजर करण्यात आले असताना त्यांच्या एनआय कोठडीत नऊ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. या वेळी न्यायालयाने सीबीआयला वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली. चौकशी करण्यासाठी वेळेचे नियोजन करा, असे न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे.