IMG-LOGO
क्रीडा

WPL 2024 : दिल्लीत आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आज अंतिम सामना

Sunday, Mar 17
IMG

महिला प्रीमियर लीगच्या निमित्ताने दोन्हीपैकी एका संघाला जेतेपदावर आपले नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे.

दिल्ली, दि. १७ : अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात रविवार, १७ मार्च रोजी महिला प्रीमियर लीग २०२४ चा अंतिम सामना खेळवला जाईल.  गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असल्याने दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर आरसीबीने एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.आयपीएल स्पर्धेत आरसीबी आणि  दिल्ली कॅपिटल्स संघाने एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. महिला प्रीमियर लीगच्या निमित्ताने दोन्हीपैकी एका संघाला जेतेपदावर आपले नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे. असा आहे संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- स्मृती मानधना (कर्णधार), ऋचा घोष, दिशा कासट, मेघना, इंद्राणी रॉय, शुभा सतीश,  सोफी डिव्हाईन, श्रेयंका पाटील, एलिस पेरी, एकता बिश्त, सिमरन बहादुर, नादिन डी क्लर्क, केट क्रॉस, , श्रद्धा पोखरकर, आशा शोभना, सोफी रेनू मोली ठाकूर सिंग, जॉर्जिया दिल्ली कॅपिटल्स- मेग लॅनिंग (कर्णधार), तानिया भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, पूनम यादव, अरुंधती रेड्डी, मारिजन कॅप, शिखा पांडे, अश्विनी. कुमारी, अपर्णा मंडल, स्नेहा दीप्ती, ॲनाबेल सदरलँड, जेस जॉन्सन, मिन्नू मणी,  तीतास साधू, राधा यादव. 

Share: