IMG-LOGO
लोकसभा २०२४

उपमुख्यमंत्री पदावरुन मुक्त होण्याच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस यांची संघाच्या वरिष्ठांशी २ तास चर्चा

Thursday, Jun 06
IMG

महाराष्ट्रात महायुतीला मोठा पराभव पत्कारावा लागल्याने महायुतीचे सर्वच नेते निराश असल्याचे दिसून येत आहे.

नागपूर, दि. ६ : नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. महायुतीच्या पराभवानंतर फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यात त्यांनी आपण उपमुख्यमंत्री पदावरुन मुक्त होण्याची विनंती आपण वरिष्ठ नेतृत्वाकडे करणार आहे. आगामी काळात मला पक्षासाठी पूर्णवेळ काम करायचं आहे. त्यामुळे, सत्तेच्या जबाबदारीतून मला मोकळं करावं, असे फडणवीस यांनी म्हटले होते.  दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीला मोठा पराभव पत्कारावा लागल्याने महायुतीचे सर्वच नेते निराश असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर, फडणवीस आज संघाची राजधानी आणि नागपुरात दाखल झाले आहेत. नागपुरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा झाली. फडणवीसांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी सुमारे 2 तास ही चर्चा झाल्याची माहिती आहे. आज सकाळी नागपुरात दाखल झाल्यानंतर फडणवीस थेट आपल्या धरमपेठेतील निवासस्थानी गेले होते. नागपुरात संघ शिक्षा वर्ग सुरु असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व प्रमुख अधिकारी सध्या नागपुरात आहेत. त्यामुळे काही वरिष्ठ अधिकारी फडणवीसांच्या घरी आले, आणि तेथे सुमारे दीड तास चर्चा झाली.

Share: