IMG-LOGO
महाराष्ट्र

मोठी बातमी ! सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला महिनाभराचा अल्टीमेटम; मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

Thursday, Jun 13
IMG

अंतरवाली सराटीत जल्लोष आणि घोषणाबाजी करण्यात आली.

अंतरवाली सराटी, दि. १३ :  मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. तसेच सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी सरकारला १ महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आम्ही विधानसभेच्या रिंगणात उतरू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं असून सरकारला 1 महिन्यांचा अवधी दिला आहे. तसेच, पुढील 1 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उभारणार असल्याचेही जरांगे यांनी यावेळी केली. त्यानंतर, मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी ज्युस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं. दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा करताच अंतरवाली सराटीत जल्लोष आणि घोषणाबाजी करण्यात आली.सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकार दिरंगाई करत आहे, असा गैरसमज मनोज जरांगेंनी यांनी करू घेऊ नये, त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा. हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवू, यावर येणाऱ्या हरकती या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवल्या जातील, शंभूराज देशाई यांनी सांगितलं.

Share: