सिल्लोडमधील भाजप संपवण्यासाठी अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील कमलेश कटारिया यांनी केला आहे.
जालना, दि. १४ : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया (Kamlesh Kataria) यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप कमलेश कटारिया यांनी केलाय. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.जालना लोकसभा मतदार संघातून तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा फटका बसला. सलग पाच वेळा रावसाहेब दानवे यांनी यामतदार संघातून विजय मिळवला होता. यावेळी मात्र त्यांना विजयाने चकवा दिली. तर १९९६ नंतर काँग्रेसने जालन्यावर विजय मिळवला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. दानवे यांच्या पराभवनंतर महायुतीचे मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. माझ्या कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या विरोधात काम केले असे जाहीर पणे सांगितले. दानेव यांनी माझ्यावर सतत अन्याय केल्याचेही सत्तार यांनी बोलून दाखवले. त्यामुळे कार्यकरते हे नाराज होते. शिवाय काँग्रेस उमेदवार कल्याण काळे हे आपले जुने सहकारी होते. विजयानंतर काळेंनी सत्तार यांची भेट घेतली होती. सिल्लोडमधील भाजप संपवण्यासाठी अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील कमलेश कटारिया यांनी केला आहे.