IMG-LOGO
महाराष्ट्र

मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा

Tuesday, May 14
IMG

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जरांगे आज संभाजी नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला

छत्रपती संभाजीनगर, दि. १४ : मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय. चार जूनला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटीतून जरांगे उपोषणाला सुरुवात करणारेत. ‘सगेसोयरे' मुद्दासाठी पुन्हा एकदा उपोषण आणि आंदोलन करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय. आठ जूनला नारायण गडावर जरांगेंची सभा होणार आहे.  सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश जर सरकारने काढला नाही  तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार याचाही पुनरुच्चार जरांगेंनी केला. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त  जरांगे आज संभाजी नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिलामी कुणालाच पाठिंबा दिलेला नाही. मी कुणालाच पाठींबा देत नाही. नोकरदारांची पदोन्नती होत नाही. दहा टक्के आरक्षण लोकांच्या कामाचे नाही. आता सामान्य मराठ्यांना वाटायला लागलंय की भरत्या थांबल्या आहेत. विधानसभेत गणित बिघडवणार नाही. मैदानातच मी राहणार आहे. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी करायला हवी. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित केला नाही तर मी मैदानात उतरणार आहे. फडणवीस शिंदे यांना आवाहन आहे की, आमच्या हक्काचं आम्हाला द्या. दिलं नाही तर 288 जाागांवर आम्ही सर्व जाती-धर्माचे लोक निवडणूक लढवणार आहोत, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

Share: