IMG-LOGO
महाराष्ट्र

चार महिन्यांत सरकार बदलायचंय; शरद पवार यांची विधानसभेसाठी तयारी जोरात

Thursday, Jun 13
IMG

चार महिन्यांत सरकार बदलायचंय आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

मुंबई, दि. १३ : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केला आहे. अशातच शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चार महिन्यांत सरकार बदलायचंय आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (इंडिया) महायुतीवर (एनडीए) मात केली. मविआने राज्यातील ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या तर महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळाला. महाराष्ट्रात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी महायुतीसमोर तगडं आव्हान निर्माण केलं. पक्ष फुटल्यानंतर ही निवडणूक ठाकरे आणि पवारांसाठी अस्तित्वाची लढाई बनली होती. मात्र या दोन्ही नेत्यांनी सर्व दावे आणि एक्झिट पोल खोटे ठरवत दमदार पुनरागमन केलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्यात नऊ तर शरद पवारांच्या पक्षाने आठ जागा जिंकल्या. दरम्यान, हे दोन्ही नेते आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. शरद पवारांनी तर आत्तापासूनच दौऱ्यांना सुरुवात केली आहे.  माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी इंदापूर तालुक्यातील नीरा खो-यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केलीय. शरद पवारांनी यावेळी निरवांगी येथे शेतक-यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या असून दूध दर च्या प्रश्नावरही शरद पवारांनी भाष्य केले. दूध उत्पादकांना पाच रुपयांचं अनुदान 100 टक्के मिळालचं पाहिजे सरकारला सांगून बघू जर सरकारने नाही ऐकलं तर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

Share: