IMG-LOGO
महाराष्ट्र

मुख्यमंत्री ४ जूननंतर तडीपार किंवा तुरुंगात जातील, बडगुजर यांच्या कारवाईनंतर राऊत संतापले

Thursday, May 09
IMG

स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री तडीपार होतील असे त्यांचे गुन्हे आहेत. मुख्यमंत्री गुन्हे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील.

नगर, दि. ९ : लोकसभा निवडणुक असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरुध्द तडिपारीची नोटीस बजावण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे. बडगुजर सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख आहेत. खासदार संजय राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. या संबंधांमुळे आजवर त्यांना पक्षासह महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली. नाशिक लोकसभेच्या प्रचाराची धुरा ते सांभाळत आहेत. सुधाकर बडगुजर यांच्याविरुध्द तडिपारीची नोटीसनंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली असून मुख्यमंत्री ४ जूननंतर तडीपार होऊन तुरुंगात जातील असे वक्तव्य त्यांनी केले आहे. संजय राऊत म्हणाले, जो प्रचारात आघाडीवर आहे, त्याच्या हातात निवडणुकीचे सूत्र आहे त्यांना तुम्ही जी नोटीस काढता याला आता काय म्हणायचे हा प्रश्न आहे. तुम्ही सगळे गुंड, तडीपार यांना तुरुंगातून सोडवून आपल्याबरोबर निवडणुकीसाठी घेतले आहेत. मी वारंवार त्याची नावं घेतलेली आहेत. ते त्यांच्याबरोबर फिरतात. तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकून त्याला तडीपार करतात. याला ४ जूननंतर उत्तर दिले जाईल. स्वतः या राज्याचे  मुख्यमंत्री तडीपार होतील असे त्यांचे गुन्हे आहेत. मुख्यमंत्री गुन्हे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील लिहून ठेवा असेही राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, धाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.  बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे. ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढल्यानं नाशिकचे  राजकारण चांगलेच तापण्याची चिन्ह आहेत. 

Share: