IMG-LOGO
महाराष्ट्र

कोल्हापुरात कारची अनेक वाहनांना धडक; तिघांचा मृत्यू

Tuesday, Jun 04
IMG

चव्हाण यांचाही अपघातावेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.

कोल्हापूर, दि. ४ : कोल्हापुरात मोटारीने अनेक वाहनांना धडक दिली. यात मोटारचालक व शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला.कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाजवळील अत्यंत वर्दळीच्या सायबर चौकात चव्हाण यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यांच्या मोटारीने आठ प्रवासी असलेल्या चार दुचाकींना उडवले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक एवढी भीषण होती, की दुचाकीवरील चौघे दूरवर उडाले व इतर चौघे मोटारीसह फरफटत गेले. अपघातात हर्षद पाटील (१६, रा. दौलतनगर) व अनिकेत चौगुले (२४, रा. आसुर्ले पोर्ले) यांचा मृत्यू झाला. जखमींवर सिटी रुग्णालयात व सीपीआर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चव्हाण यांचाही अपघातावेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Share: