IMG-LOGO
क्रीडा

धोनीनं २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी

Sunday, Aug 16
IMG

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या एम.एस. धोनीच्या निर्णयाचे देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

दिल्ली, दि. १६ ऑगस्ट:  भाजपचे दिग्गज नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीच्या कामगिरीचं कौतुक करत त्याला राजकारणात येण्याचा सल्ला दिलाय. धोनी हा लढवय्या आहे, त्याच्या सारख्या माणसांची समाजाला गरज आहे, त्याने लोकसभेची 2024ची निवडणुक लढवली पाहिजे असा सल्लाही त्यांनी धोनीला दिलाय.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या एम.एस. धोनीच्या  निर्णयाचे देशभर पडसाद उमटत आहेत. सगळ्याच क्षेत्रातल्या मान्यवरांनी धोनीच्या खेळाचं कौतुक करत भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.निवृत्तीच्या घोषणेनंतर धोनीने मात्र याबाबतीत अजुन कुठलेली संकेत दिलेले नाहीत.स्वामी म्हणाले, धोनी हा लढवय्या आहे. त्याच्याकडे अडचणींवर मात करण्याची क्षमता आहे. आव्हानांना सामोरे जाण्याची आणि नेतृत्व करण्याची क्षमता त्याने सिद्ध केली आहे. त्याच्यासारख्या माणसांची समाजाला गरज आहे.त्यामुळे धोनीने लोकसभेची 2024ची निवडणू लढविली पाहिजे असंही स्वामी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे धोनी राजकारणात येणार का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Share: