अजिंक्यच्या वडीलांना सिगारेट पिण्यास श्रीराव विरोध करीत होते.
धुळे, दि. २२ जून : शहरातील राजहंस कॉलनीत राहणार्या रमेश श्रीराव या निवृत्त बँक कर्मचार्याची हत्या करण्यात आली आहे. श्रीराव यांच्या घरात राहणार्या भाडेकरूच्या मुलानेच रागाच्या भरात खून करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी अजिंक्य मेमाणे या 23 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. अजिंक्यच्या वडीलांना सिगारेट पिण्यास श्रीराव विरोध करीत होते. त्यामुळे अंजिक्यने त्यांची हत्या केली. अजिंक्य कोपरगावला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.