IMG-LOGO
क्रीडा

ड्रीम ११ तेराव्या आयपीएलची टायटल स्पॉन्सर

Tuesday, Aug 18
IMG

ड्रीम-११ ने हे अधिकार सर्वाधिक २२२ कोटी रुपयांची बोली लावत मिळवले.

नवी दिल्ली, दि. १८ ऑगस्ट  :  चीनी कंपनी व्हिवो या वर्षीच्या आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपवरून मागे हटल्यानंतर बीसीसीआय भारतातील स्पॉन्सर शोधत होते. आता मोबाईल फँटेंसी लीगसाठी प्रसिद्ध असलेल्या ड्रीम इलेव्हनने (Dream11) अनेक कंपन्यांना मागे टाकत आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे.ड्रीम-११ ने हे अधिकार सर्वाधिक २२२ कोटी रुपयांची बोली लावत मिळवले. बीसीसीआयने व्हिवोची स्पॉन्सरशिप रद्द करत नवीन स्पॉन्सरशिपसाठी अर्ज मागवले होते. ड्रीम ११ ने त्यांच्या आर्थिक बोलीच्या जोरावर आयपीएल २०२० चे प्रायोजकत्व जिंकलेले दिसून येते. बीसीसीआयने आधी म्हटले होते की, फक्त पैशांचा विचार करून प्रायोजकत्व दिले जाणार नाही. मात्र, दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लावणाऱ्या अनअकॅडमी पेक्षा ड्रीम ११ ची बोली १२ कोटीपेक्षा अधिक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, प्रायोजकत्व देताना आर्थिक बाबींचा विचार नक्कीच केला गेला आहे.

Share: