IMG-LOGO
महाराष्ट्र

ईडी कुणावरही पुराव्याशिवाय छापा टाकत नाही : फडणवीस

Tuesday, Nov 24
IMG

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

सोलापूर, दि. २४ नोव्हेंबर : काही पुरावे असतील म्हणून ईडीनं कारवाई केली असेल. काही ठोस पुरावे हाती असल्याशिवाय ईडी कारवाई करत नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या संपूर्ण घडामोडींचा तपशील माझ्याकडं नाही. त्यामुळं मी त्यावर फारसं काही बोलणार नाही. मात्र, माझ्या माहितीनुसार, ईडी कुणावरही पुराव्याशिवाय छापा टाकत नाही. त्यांनी तशी कारवाई केली असेल तर नक्कीच त्यांच्याकडे काही तक्रारी किंवा मटेरियल असेल. असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यानंतर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Share: