माझ्याविरुद्ध देवेंद्र फडणीस यांनी षडयंत्र रचले, मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो.' असा गंभीर आरोप माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.
जळगाव, दि. १० सप्टेंबर : माझ्याविरुद्ध देवेंद्र फडणीस यांनी षडयंत्र रचले, मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो.' असा गंभीर आरोप माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘जनसेवेचा मानबिंदू’ या खडसे यांच्या चरित्राचे ऑनलाइन प्रकाशन झाले. या वेळी खडसे म्हणाले, की मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले; पण खानदेशाला कधीच संधी मिळाली नाही. आमचा मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) ड्राय क्लीनर, कोणावरही आरोप झाले, की लगेच क्लीन चिट दिली; पण मला निर्दोष असताना क्लीन चिट नाही. खडसे म्हणाले, कीलोक म्हणतात नाथाभाऊंचे पक्षात काही अडकले असेल, म्हणून अन्याय होऊनही ते पक्ष सोडत नाहीत; परंतु असे काही नाही. मी कधीच पक्षाविरोधात बोललो नाही. माझा जीव पक्षात अडकला आहे, म्हणूनच सगळ सहन करतो आहे. मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो. चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करण्याची धमक ज्याच्यामध्ये असते, त्यांच्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करायची धमक ठेवतात. ती धमक माझ्यात आहे,' असे ते म्हणाले.