उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं.
मुंबई, दि. ३ : मतदानादिवशी पत्रकार परिषद घेणं उद्धव ठाकरे यांना भोवणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission) राज्य निवडणूक आयोगला (State Election Commission) दिले आहेत. राज्यात मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.