IMG-LOGO
क्रीडा

दिमाखदार विजयासह इंग्लंडची मालिकेत 2-1 ने आघाडी

Wednesday, Mar 17
IMG

भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडला 157 धावांचं आव्हान दिलं. भारताचे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यावर विराटनं एक बाजू सांभाळत भारताचा डाव सावरला.

अहमदाबाद, दि. १७ मार्च :  भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहुण्यासंघाने 8 गडी राखून जिंकला. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने तर इंग्लंडकरून जोस बटलरने आक्रमक फलंदाजी केली. बटलरच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने हा सामना सहज जिंकला.भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडला 157 धावांचं आव्हान दिलं. भारताचे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यावर विराटनं एक बाजू सांभाळत भारताचा डाव सावरला. त्यानं आक्रमक फलंदाजी करत 46 चेंडूत 77 धावांची खेळी केली. ही त्याची इंग्लंड विरूद्धची सर्वाधिक धावसंख्या होती. तर या सामन्यात मार्क वूडने चांगली गोलंदाजी करत 3 महत्वाचे गडी बाद केले.त्यानंतर 158 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामी फलंदाज जोस बटलर मैदानात पाय रोवून उभा राहिला. शेवटपर्यत त्याने आपली विकेट पडू दिली नाही. त्यानं 52 चेंडूत फटकेबाजी करत 83 धावांची खेळी केली. तर त्याला जाॅनी बेयरस्टोनची मोलाची साथ मिळाली. भारताकडून चहल आणि सुंदरला 1-1 बळी मिळाला.भारताच्या टॉप ऑर्डर्सने पुन्हा एकदा निराशा केली. के.एल. राहुल, इशान, किशान आणि रोहित शर्मा यांना चमकदार खेळी करता आली नाही. के.एल. राहुलला भोपळाही फोडता आला नाही. किशान 4 तर रोहित 15 रन्सवर आऊट झाला. याचमुळे भारतीय संघाला मॅचमध्ये पुनरागमन करता आला नाही. पहिल्या टी 20 मध्ये देखील भारतीय टॉप ऑर्डर्स बॅट्समनने सपशेल निराशा केली होती.

Share: