'दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही बोर्डांच्या संमतीने खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देत, उभय संघातील वनडे मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.' इंग्लंडनेही रविवारी त्यांच्या टीममध्ये दोन जण पॉझिटिव्ह असल्याचं अनौपचारिकपणे सांगितलं.
केपटाऊन, दि. ७ डिसेंबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना रद्द झाला होता. आता संपूर्ण मालिकाच रद्द झाली आहे. टॉसआधीच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वनडे सीरिज रविवार 6 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सहमतीने मालिका रद्दचा निर्णय झाल्याचं दक्षिण आफ्रिका बोर्डाने स्पष्ट केलं आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करताना म्हटले आहे की, 'दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही बोर्डांच्या संमतीने खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देत, उभय संघातील वनडे मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.' इंग्लंडनेही रविवारी त्यांच्या टीममध्ये दोन जण पॉझिटिव्ह असल्याचं अनौपचारिकपणे सांगितलं. दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूसह ते राहात असलेल्या हॉटेल स्टाफपैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. वास्तविक खेळाडूंचं वास्तव्य असलेलं हे हॉटेल बायो सिक्युअर वातावरणात होतं. पण या बायो बबलचं उल्लंघन करून नियम मोडण्यात आले आणि त्याचा परिणाम थेट सामने रद्द होण्यापर्यंत झाला.