राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
मुंबई, दि. २ : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्या कारणाने त्यांच्या सुरक्षेत थेट फोर्स वनची वाढ करण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत फडणवीसांवरच निशाणा साधला आहे.” देवेंद्र फडणविसांना कुणापासून धोका आहे, मुख्यमंत्र्यांपासून? असा खोचक प्रश्न विचारत खासदार संजय राऊत यांनी थेट फडणीसांवरच निशाणा साधला आहे. त्याचबरोबर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वत: चीच सुरक्षा स्वत:च वाढवली आणि अत्याधुनिक शस्त्रे असलेली सुरक्षा रक्षक त्यांच्या घराला गराडा घालून बसलेत. म्हणजे राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नाही. हा काय प्रकार आहे. गृहमंत्रीच स्वत:ची सुरक्षा वाढवत आहेत. नागपूरच्या, मुंबईच्या घराबाहेर फोर्स वनचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्रालाही चिंता आहे. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, की काही अघटित घडणार आहे का, अशी शंका आमच्या मनात आली, फडणवीसांना कुणापासून धोका आहे. मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. भविष्यात मुख्यमंत्री पदाची लढत पुढच्या 15 दिवसात वाढणार आहे. पण मला प्रश्न आहे की फडणवीसांना स्वत:चीच सुरक्षा वाढवावीशी का वाटली. एक गृहमंत्री स्वत:चीच सुरक्षा वाढवतो. जी फोर्स वन अतिरेक्यांशी लढण्यासाठी बनवण्यात आली होती. ती फोर्स राज्याचे गृहमंत्र्यांच्या बाहेर तैनात करण्यात आले आहे.