IMG-LOGO
महाराष्ट्र

शेतकरी आंदोलन : .तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील- संजय राऊत

Tuesday, Dec 08
IMG

आज शेतकरी रस्त्यावर आहे, आज तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील याची खात्री आहे

मुंबई, दि, ८ डिसेंबर : शेतकरी आंदोलनावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र राजकीय मतभेद बाजूला ठेवून विचार केला तर फडणवीसदेखील आंदोलनाला पाठिंबा देतील असं म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये पवार कृषिमंत्री होते. त्या काळात त्यांनी नियुक्त केलेल्या एका कार्य गटाने केलेल्या शिफारशींच्या आधारेच हे कायदे बनविण्यात आले आहेत. त्यामुळे या कायद्यांना पाठींबा द्यायचा की विरोध करायचा याबाबत पवार द्विधा मन:स्थितीत होते. मात्र, राजकीय हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी विरोधाचा मार्ग पत्करला, असा दावा फडणवीस यांनी केला होता.दरम्यान, शेतकरी आंदोलनावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र राजकीय मतभेद बाजूला ठेवून विचार केला तर फडणवीस देखील आंदोलनाला पाठिंबा देतील असं म्हटलं आहे. आज शेतकरी रस्त्यावर आहे, आज तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील याची खात्री आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

Share: