IMG-LOGO
क्रीडा

यशपाल शर्मा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Tuesday, Jul 13
IMG

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी ४२ सामन्यात २८.४८च्या सरासरीने ८८३ धावा केल्या.

नवी दिल्ली, दि. १३ जुलै : माजी क्रिकेटपटू आणि १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा (वय ६६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यशपाल शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरोधात सियालकोट येथील एकदिवसीय सामन्यात १९७८ मध्ये डेब्यू केला होता. शर्मा यांनी १९८५ मध्ये इंग्लंड विरोधात चंदीगढ़ येथे शेवटची वन-डे खेळली होती. तर वेस्टइंडीज विरोधात दिल्ली येथे १९८३  मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. भारताकडून यशपाल शर्मा यांनी ३७ कसोटी सामन्यांमध्ये १६०६ धावा केल्या आहेत. यात १४० धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी ४२ सामन्यात २८.४८च्या सरासरीने ८८३ धावा केल्या.

Share: