काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील रुग्णालयात उपचार सुरु होते.
लखनऊ, दि. १६ ऑगस्ट : माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चेतन चौहान हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अवयव निकामी झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1969 ते 1978 या कालावधीत चौहान यांनी 40 कसोटी सामने खेळले होते. 31.57च्या सरासरीने त्यांनी 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतके आहेत. कसोटीव्यतिरिक्त त्यांनी 7 एकदिवसीय सामन्यांत 153 धावा ही केल्या. त्यांनी रणजी चषक स्पर्धेत दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते.