IMG-LOGO
महाराष्ट्र

पावसाच्या सरींनी बाप्पाचं स्वागत!

Saturday, Sep 07
IMG

विजांच्या कडकडाटासह वादळ पडण्याची शक्यता आहे. या पावसात बाप्पांचे आगमन झाले.

मुंबई, दि. ७ :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांत आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याने अनेक जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, घाट परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ पडण्याची शक्यता आहे. या पावसात बाप्पांचे आगमन झाले. 

Share: