IMG-LOGO
मनोरंजन

'गोष्ट एका कावळ्याची', 'स्टे सेफ', ने पटकावला कलातीर्थ २०२१

Sunday, Jan 10
IMG

नामांकन मिळालेल्या सर्व लघुपटांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर, औरगाबाद, अमरावती, कोल्हापूर, यवतमाळ, ठाणे, डोंबिवली, राहता, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यासह सिकंदराबाद येथून एकूण मिळून ७३ स्पर्धक सहभागी झाले होते.

नाशिक, दि. १० जानेवारी : सामाजिक संदेश देणाऱ्या "स्टे सेफ" (मुंबई) आणि "गोष्ट एका कावळ्याची" (रत्नागिरी) या लघुपटांनी अनुक्रमे एक मिनिट आणि एक ते दहा मिनिट या वर्गात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान राखत "कलातीर्थ - २०२१" चा किताब पटकावला. भारतीय चित्रसाधना आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने "कलातीर्थ लघुपट महोत्सव - २०२१" चे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर  दादासाहेब फाळके यांची नात स्वाती फाळके-काळे, पणती गिरीजा मराठे-फाळके, नातसुन वासंती फाळके तसेच चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे नातू भरत दैनी आणि नात सई पेंढारकर-सपकाळे यांसह विजय कदम व स्पर्धेचे परीक्षक चंद्रशेखर कुलकर्णी उपस्थित होते. याशिवाय परीक्षक म्हणून विलास घुले यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. याशिवाय विविध श्रेणीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मंथन खांडके, मनोज भिसे (गोष्ट एका कावळ्याची), सर्वोत्कृष्ट लेखक विशाल दवंगे (पॉईंट टू बी नोटेड), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण मिलिंद आडेलकर (संकासुर), सर्वोत्कृष्ट संपादन मयुरेश बावरे (क्लोजर), सर्वोत्कृष्ट संगीत मिलिंद गोवेकर (गोष्ट एका कावळ्याची) यांना गौरविण्यात आले. परीक्षकांच्या वतीने चंद्रशेखर कुलकर्णी यांनी स्पर्धकांना सूचना वजा मार्गदर्शन केले. नामांकन मिळालेल्या सर्व लघुपटांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर, औरगाबाद, अमरावती, कोल्हापूर, यवतमाळ, ठाणे, डोंबिवली, राहता, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यासह सिकंदराबाद येथून एकूण मिळून ७३ स्पर्धक सहभागी झाले होते.        महोत्सव यशस्वीतेसाठी "कलातीर्थ"चे शौनक गायधनी, सुमंत वैद्य, जयदीप पवार, अभिषेक पिंगळे, महेश चौधरी, समीर देव, तेजस बिल्दीकर, तेजस देव, स्वरदा कुलकर्णी , पुष्कर पाडेकर, श्रीकृष्ण कुलकर्णी, डॉ. प्रसाद जोशी, अवंती रत्नपारखी, पराग लेले, शुभम तोटीगर, गौरजा महामिने, कविता देसाई यांनी परिश्रम घेतले.  

Share: