थरावून कोसळून गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पाचोरा, दि. २९ : दहीहंडी फोडताना थरावरून कोसळून गोविंदा जखमी झाल्याच्या घटना राज्यातील अनेक शहरात घडल्या होत्या. केवळ मुंबईत काल थरावरून कोसळून २४५ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातच जळगावमधून एक दु:खद बातमी समोर येत असून दहीहंडी फोडताना थरावून कोसळून गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ही घटना घडली आहे. नितीन चौधरी असे मृत गोविंदाचे नाव आहे.