IMG-LOGO
महाराष्ट्र

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Sunday, Jan 03
IMG

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सावित्रीमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि एक पणती लावून त्यांना अभिवादन केले.

मुंबई दि. ३ जानेवारी : क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात खासदार सुप्रियाताई सुळे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सावित्रीमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि एक पणती लावून त्यांना अभिवादन केले. यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण, मुंबई महानगरपालिका गटनेत्या राखी जाधव, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवती अध्यक्षा अदिती नलावडे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share: