IMG-LOGO
महाराष्ट्र

आ. अमोल मिटकरी यांना भाषण करताना अर्धागवायूचा झटका

Monday, Jul 12
IMG

मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.

अकोला, दि १२ जुलै : शिवव्याख्याते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदाल अमोल मिटकरी यांना अकोला जिल्ह्यातील हिंगणा येथे भर सभेत बोलत असताना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या गायिका वैशाली माडे या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांच्याकडे राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बी. फॉर्म कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मिटकरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली 'माझी मैना गावाकड राहिली..' ही छक्कड गायला सुरुवात केली; पण अचानक मिटकरी यांचा आवाज बसला आणि त्यांचा चेहरा वाकडा होत असल्याचे जाणवू लागले, त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन त्यांना सांभाळले.मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.  मिटकरी यांच्या प्रकृतीत आज सुधारणा झाली आहे. माझी प्रकृती आता ठीक असून कोविडची परिस्थिती असल्यामुळे मला भेटायला येऊ नये, मी आता ठीक आहे, अशी विनंती मिटकरी यांनी केली आहे.

Share: